महाराष्ट्र सरकारचा मोठा आदेश; सार्वजनिक ठिकाणांवरून भटके कुत्रे हटवा..
स्थानिक संस्थांनाही तात्काळ कारवाईचे दिले निर्देश सार्वजनिक स्थळावरुन कुत्र्यांना हटवा -खाऊ घालणाऱ्यांवर होणार कारवाई अँटी-रेबीज लसीचा साठा बंधनकारक
मुंबई:-भटक्या कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवण्याचा निर्णय मे.सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.आता महाराष्ट्र सरकारनेही याबाबत कठोर भूमिका घेत सोमवारी दि.२४/११/२०२५ नवा शासन निर्णय काढला आहे.भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बंधित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.यानुसार महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींना तात्काळ कारवाई बंधनकारक करण्यात आली आहे.