महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटक केडगाव विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटक केडगाव विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे रविवार दि.५/१२/२०२१ रोजी सकाळी साडेदहा वाजता केडगाव ता.दौंड येथील जयश्री गार्डन टोलनाक्याजवळ आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी संघटना नामफलकाचे अनावरण करण्यात येणार असून राज्य सरचिटणीस गजानन अवचट, महापारेषण राज्य सरचिटणीस विलास चौधर, संघटक सचिव सुरेश देवकर, मंडल अध्यक्ष मनोज कदम, मंडल सचिव अतुल वाघमोडे, केडगाव विभाग सचिव तुकाराम प्रभाकर गवळी विभागीय कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहाणार आहेत.
कोरोनाचे सर्व नियम पाळून मेळाव्यास,संघटना नामफलक अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.