ग्रामस्थ मंडळ टिटवाळा तर्फे महाशिवरात्री उत्साहात साजरी
ग्रामस्थ मंडळ टिटवाळा तर्फे टिटवाळा येथील शिव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठया उत्साहात साजरा हजारो भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिराला सुंदर अशी सजावट तसेच विदयुत रोषणाई करण्यात आली होती. 25 तारखेला रात्री 12 वाजता अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. तसेच उपवास असणाऱ्या भाविकांना खिचडी, फळ वाटप करण्यात आले. महाशिवरात्री च्या दिवशी भजन व विविध कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ मंडळ टिटवाळा तर्फे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ भाविक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.