महावितरणचे डोके ठिकाणावर आहे का...?
अधिकारी जोमात मात्र कर्मचारी कोमात.
टिटवाळ्यातील महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार या शिर्षकाखाली टिटवाळा न्यूजने बातमी प्रदर्शित करून अशिक्षित,विधवा,ज्येष्ठ नागरिक महिला शोभा सोपान भिलारे या महिलेची व्यथा मांडली होती. सदरील बातमीची दखल घेत महावितरणचे मांडा टिटवाळा येथील अभियंता गणेश पवार यांनी दखल घेऊन सदरील महिलेचे बिल चेक करून त्यांना न्याय दिला जाईल अशे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना सदरील अर्ज घेऊन जकात नाका येथील महावितरणच्या कार्यालयात जाण्यास सांगितले होते. भर उन्हातान्हात सदरील महिला हि पायपीट करीत तिथे पोहचल्यावर व दिलेला अर्ज दाखवल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तिच्या ०२०१११११२१४३ या कंझुमर बिला ऐवजी ०२०११०३२९७७७ हे सुशीला अशोक कुमार यादव ह्या नावाचे बिल हातात सोपवून या बिलाची ५२० रुपये रक्कम भरण्यास सांगितले. सदरील महिलेने आज पैसे नाहीत उद्या भरते म्हणून सांगून तिथून निघून आली असता तिने आजूबाजूच्या नागरिकांना सदरील बिल दाखवल्यावर सदरील बिल हे अन्य दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे सिद्ध झाले. याबाबत सदरील महिलेने टिटवाळा न्यूज कार्यालयात येऊन आपल्याला हे दुसऱ्याच व्यक्तीचे बिल भरण्यास सांगितले असल्याचे सांगितल्याने याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंता गणेश पवार यांना सदरील बिल व महिलेचे बिल हे दोन्ही व्हाट्सअपवर पाठवून या बाबत चौकशी करायला सांगितले असता. पवार यांनी आता मी जकात नका येथील कार्यालयातच बसलेलो असून सद्दल महिलेच्या बिल चेक करीत असून तिचे बिल योग्य ते करून देऊ आपण सदरील महिलेला माझ्या कार्यालयात पाठवा असे सांगितले. मात्र एकीकडे महावितरणचा अनागोंदी कारभार सुरु असताना आणि सर्व सामान्य नागरिकांना ऊन पावसात आपल्या तक्रारी घेऊन हेलपाटे मारावे लागत आहेत. एकीकडे अधिकारी वर्ग चांगल्या पद्धतीने काम करीत असताना मात्र त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून विद्युत ग्राहकांची दिशाभूल करण्याचेच काम सुरूच असल्याने अधिकारी जोमात तर कर्मचारी कोमात आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे टीव्हीवर शाहरुख खान आर्यन खानच्या गांजाच्या बातम्यांनी दिवसभर तेच तेच पाहून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही याची झिंग चढलीय का असा प्रश्न या निमित्ताने नागरिकांतून उपस्थित होत आहे.