कल्याण माळशेज घाट महामार्गावर ट्रॅव्हलर पलटली १० किरकोळ तर 3 जण गंभीर जखमी !
आळेफाटा येथुन कल्याण येथे प्रवाशी घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हलर बस माळशेज घाटातील वैशाखरे येथील वळणावर पलटली सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
एसटी बस बंद असल्याने प्रवाशी खाजगी वाहनाने प्रवास करत आहेत आळेफाटा वरून कल्याण येथून 17 प्रवासी घेऊन जात असताऺना माळशेज घाट महामार्ग वैशाखरे वळणावर गाडीने चार पलट्या मारल्या असून या अपघाता मध्ये अनिता पारवे सोहनी गोडवे, विनयाक पारवे . रा.जुन्नर दत्तात्रय विटेकर रा. पिंपरी पेढार यांना मुरबाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बाकीचे टोकावडे ग्रामीण रुग्णालय येथे असून याबाबत टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.