सामाजीक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जोपण्याचे महत्वाचे काम मेहबूबभाई करीत असून लॉकडाऊन नंतर वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. हे हेरून मुरबाड मधील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारे मेहबूबभाई पैठणकर यांनी वारकऱ्यांना पंढरपूर येथे दर्शनासाठी पाठवले याचा मला सार्थ अभिमान असून ते खरे माणसातले देवमाणूस असल्याची प्रतिक्रिया मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी व्यक्त केली.
मेहबूबभाई अब्दुलरहेमान पैठणकर यांच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता वारकऱ्यांच्या साठी मुरबाड ते पंढरपूर बससेवा आयोजीत करण्यात आली होती.या प्रवासाच्या लक्झरी बसला नारळ वाढवून आणी हार घालून पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सुखरूप प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.मेहबूबभाई यांच्या कडून भविष्यातही सामाजीक हिताचे व लोकोपयोगी कार्य घडोत त्यांचे सर्वच उपक्रम वाखान्यजोगे असून अशीच सेवा त्यांच्या कडून पार पडो अशा शुभेच्छा या वेळी पांढरे यांनी दिल्या.
या प्रसंगी मेहबूबभाई पैठणकर, हभप हरीचंद्र ईसामे, समीर पैठणकर वारकरी वृंद उपस्थित होते.