• Total Visitor ( 84941 )

मांडा टिटवाळ्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री सुरूच

Raju Tapal September 17, 2022 32

मांडा टिटवाळ्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री सुरूच 

त्या "सहा" होलसेलरवर कारवाई कधी....?

राज्य शासनाने राज्यात गुटखा बंदी लागू केली असली तरीही परराज्यांतून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी येत आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंबंधी कायदा असतानाही मांडा टिटवाळ्यात खुले आम गुटखा विक्री सुरूच आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, अन्न व औषध प्रशासनाने गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करण्याबरोबरच कलम ३२८ अन्वये गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जात असतानाही बाहेरील राज्यांमधून महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात गुटखा विक्रीसाठी येत असून गल्ली बोळातील अनधिकृत दुकाने टपऱ्यांबरोबरच शाळा-कॉलेजच्या परिसरात त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. मांडा टिटवाळ्यात गुटखा विक्रीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून तिच्यावर अंकुश ठेवणे अतिशय जिकरीचे झालेले आहे. तीन वर्षांपूर्वी मांडा पश्चिमेतील पंचवटी परिसरात होलसेल गुटखा सप्लाय करणाऱ्या शाहू नावाच्या व्यक्तीवर व अन्य एक जणावर गुन्हा दाखल होऊन त्यांची मोठी जेलवारी टिटवाळा पोलिसांकडून करण्यात आली होती. तर मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा हि सापडला होता. मात्र त्या नंतर अन्न सुरक्षा अधिकारी तसेच फिर्यादी किरण बळवंत जाधव अन्न सुरक्षा नियम २६/२७ आयपीसी कलम १८८,३२८,२७२,२७३ अन्व्ये टिटवाळा रेल्वे स्टेशन जवळील तिवारी बिल्डिंग मधील साई पान शॉप या दुकानावर धाड टाकून आरोपी अशोक बाबुलाल पटवा राहणार सावरकर नगर,टिटवाळा यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील धाडीत विमल,दंगल केसर,शुद्ध प्लस,केसर विमल,प्रिमियम विमल,सुगंधी पान मसाला,प्रिमियम एनपी,प्रिमियम रजनीकांत इत्यादी प्रकारचे तब्बल ५८०१ रुपयांचा गुटखा सापडला असल्याची नोंद पोलीस दफतरी करण्यात आलेली होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत पुन्हा कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे ऐकिवात नाही त्यामुळे गुटखा विक्री येथे मोठ्या प्रमाणात बिनदिक्कतपणे सुरु आहे. मात्र पान टपरी चालकांना गुटखा सप्ल्याय करणारे तब्बल अर्ध्या डझनाच्यावर असलेले होलसेलर अद्यापही मोकाटच असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार कधी असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने मांडा पश्चिमेतील पंचवटी परिसरातील होलसेल गुटखा विक्रेता ओ.पी.गुप्ता(साहू) याला सर्वात मोठा सप्लायर मानलं जात होत त्याच्यावर अन्न सुरक्षा विभागाने अनेकदा धाडी टाकलेल्या आहेत. तर टिटवाळा पोलिसांनी गुटख्याची मोठी कारवाई करीत त्याचे कंबरडे मोडले होते. मांडा पश्चिमेतील एक २२० गाडी घेऊन फिरणारा नईम अन्सारी हा देखील सप्ल्यायर मध्ये चर्चित आहे. वासुंद्री येथे राहणारा मेहबूब कासकर हा देखील गुटखा सप्लायर म्हणू चर्चेत आहे. मांडा पुर्वेतील इंदिरानगर रोडवरील रविंद्र आर्केड समोरील महेश साबळे व जितू साबळे हे दुचाकीवरून गुटखा सप्ल्याय करतात. इंदिरा नगर येथे राहणारा संदीप गुप्ता हा आपल्या स्कुटीवरून गुटखा सप्ल्याय करतो असे काही दुकानदार सांगतात. बल्याणीतील जगदीश गोंधळे हा देखील गुटखा सप्ल्यायर म्हणून असल्याचे पान टपरी चालक सांगतात. हे सर्वच गुटखा सप्ल्यायर सकाळी सहा ते साडेसहा वाजल्यापासून आपला गुटखा सपलाय करण्याचे काम करीत असतात. गोवेली व बल्यानी रस्त्यावरून यांची प्रमुख येण्याजाण्याची वर्दळ असते. यातील बऱ्याच जणांची प्रसाशनाशी आर्थिक देवाण घेवाण असल्याने त्यांच्यावर शक्यतो कारवाई होत नसल्याचे खात्रीलायक रित्या समजते. वीस ते पंचवीस हजार रुपये एवढी आर्थिक चिरीमिरी दिल्यानंतरच त्यांना सुखासुखी धंदा करता येत असल्याचे एका गुटखा सप्ल्यायर ने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे गुटखा विक्री मध्ये ठोस कारवाई न होण्यामागे हे आथिर्क साटेलोटे असल्याचे निष्पन्न होत असल्याने कारवाईच्या बहाण्याने येथे आपली तुंबडीचं भरण्याचे उद्दिष्टय ठेवून अन्न सुरक्षा विभाग काम करीत असल्याचे नागरिकांतून बोलले जात असून न्यायालयाच्या निर्णयाला हि फाट्यावर मारण्याचे काम सर्रास होत असल्याचे येथील गुटखा विक्री वरून समजते. या समस्येवर वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन येथील गुटखा विक्री बंद होऊन व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या तरुणाचा पालनहर्ता कुणी ठरतो का हे आता बघावे लागणार आहे.

Share This

titwala-news

Advertisement