मांडा टिटवाळ्यातील रस्त्यांची दुरावस्था
मनसेचे अ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'अ' प्रभाग क्षेत्र टिटवाळातील डी.जे.वन ते हरी ओम व्हली,अभिदर्शन पार्क कडे जाणारा रस्ता व सांगोडा रोड,वासुद्री रोड,टिटवाळा पश्चिम येथील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे.त्यामुळे रस्त्यावर चिखल,ठिकठिकाणी पाणी साचणे, अति धोकादायक खड्ड्यांचे साम्राज्य दिसत असल्यामुळे ये-जा करणाऱ्या गाड्यांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे.तसेच तातडीने रुग्णाला रुग्णालयात वेळेवर पोहचण्यास विलंब होत असल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णांच्या जिवितास संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.त्याच प्रमाणे नेहमी वाहतूक करणारे रहिवासी,नागरिक प्रवासी व चालक यांना शारीरिक,मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच रस्त्यावर चिखल,जागोजागी असलेले खड्डे व साचलेले पाण्यामुळे वाहतूक करण्यास अडथळे निर्माण होऊन अनुचित घटना घडु शकते. तसेच पावसाळा ऋतू असल्यामुळे पाऊस सुरु झाल्यावर रस्त्याची परिस्थिती अजुन बिकट होऊन प्रवास करणे सर्वसामान्य नागरिकांना कठीण होईल
टिटवाळा, पूर्व व पश्चिम कडील रस्त्याची झालेली दुरावस्थाबाबत लवकरात लवकर काम सुरु करावे अशी मागणी मनसेचे जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयेश खंदारे, उपविभाग अध्यक्ष बंदेश जाधव, शाखा अध्यक्ष मिलिंद सावंत, उपशाखा अध्यक्ष कु.अमेय पाटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.