मांडवगण फराटा येथील घटनेतील समीर तावरे याचा मृत्यू
Raju Tapal
November 21, 2021
37
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे गुरूवार दि.१८/११/२०२१ रोजी घडलेल्या घटनेतील समीर भिवाजी तावरे याचा शनिवारी दि.२० नोव्हेबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी गृहकलहातून समीर तावरे याची विधवा बहीण माया सोपान सातव वय -३२ हिने विहीरीत आत्महत्या केली होती. बहिणीचा मृतदेह विहीरीत आढळून आल्यानंतर समीर तावरे याने स्वत:ची पत्नी वैशाली तावरे वय -२८ हिच्या गळ्यावर कु-हाडीने घाव घालून खून केला होता.त्यानंतर स्वत:ला संपविण्यासाठी तो देखील विषारी औषध प्यायला होता. विषारी औषध घेतल्यानंतर अत्यावस्थेत त्याला दौंड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र आज शनिवारी दि.२० नोव्हेबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
समीर याच्या मागे वडील, आई,११ वर्षांचा मुलगा, ७ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
Share This