मनमाडला संविधान गौरव दिन साजरा
नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील ऑल इंडिया एससी / एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन तर्फे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला.
संविधान दिना निमित्ताने सकाळी आठ वाजता मनमाड रेल्वे व्हाट्सअप मध्ये टाइम बूथ समोर संविधानाच्या उद्देशकीचे वाचन करण्यात आले. सचिव सतीश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कारखाना प्रबंधक पापा चंद, कार्यकारणी सदस्य प्रवीण भाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, जुनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाडचे सचिव संदीप धीवर, कारखाना शाखेचे उपाध्यक्ष सागर गरुड, कारखाना शाखेचे अतिरिक्त सचिव रमेश पगारे आदी उपस्थित होते.
यावेळी संतोष शिलावट यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले, तसेच वेल्डिंग विभागातील महिला कर्मचारी पूजा सुपेकर, सुवर्णा होलणार, व GM पुरस्कार मिळालेले कर्मचारी मनीष साबळे यांचा सत्कार सहाय्यक कारखाना प्रबंधक पापा चंद यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद ओमन यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिन इंगळे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखेचे अध्यक्ष सुभाष जगताप, कारखाना शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप पगारे, बहुजन युवक संघाचे अध्यक्ष रोहित भोसले, बहुजन युवक संघाचे सचिव नवनाथ जगताप
कारखाना शाखेचे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे कारखाना शाखेचे कार्यालय सचिव संदीप पगारे, वरिष्ठ कार्यकर्ते रवींद्र पगारे, अजय केदारे, फकीरा सोनवणे, किरण वाघ, राहुल शिंदे, प्रेमदीप खडताळे, विनोद झोडपे, वरून म्हसदे, अभय बागुल, अनिल अहिरे, राजेंद्र सोनवणे, राजेश जगताप, निखिल सोनवणे, संतोष सावंत, धमाल पाखळे, आदींनी केले. यावेळी कामगार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.