• Total Visitor ( 84524 )

मानपाडा पोलिसांनी दोन गांजा तस्करांना ठोकल्या बेड्या

Raju Tapal July 03, 2022 39

मानपाडा पोलिसांनी दोन गांजा तस्कारांना ठोकल्या बेडया, ओरिसाहून आणलेला तब्बल 272 किलो गांजा हस्तगत 

ओरीसाहून गांजा तस्करी  करणाऱ्या दोन जणांना मानपाडा पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून 272 किलो गांजा हस्तगत केला असून यातील आणखी काही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, गांजा कोणी आणि कोणाला देण्यासाठी आाणला होता या अनुषंगाने पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

काही लोक गांजा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. यानंतर तातडीने पोलीस अधिकारी अनिल भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कल्याण ग्रामीणमधील उंबार्ली परिसरात पोहचले. याठिकाणी पोलिसांना एक संशयित इनोव्हा गाडी दिसली. गाडीत बसलेल्या व्यक्तींची पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांच्याकडून उलटसुलट उत्तरे देण्यात आली. यावरुन पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. व पोलिसांनी त्या दोन जणांना ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता गाडीतून 272 किलो वजनाचा गांजा आणि सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे यांनी सांगितले की, कारवाईत मोठया प्रमाणात गांजा जप्त केला असून या प्रकरणी फैजल ठाकूर आणि आातिफ अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. डीसीपी सचिन गुंजाळ, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Share This

titwala-news

Advertisement