व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याच्या वतीने पोटॅश खत निर्मिती
शिरूर :- शिरूर तालुक्यातील लक्ष्मीनगर,जातेगाव बुद्रूक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याच्या वतीने पोटॅश खत निर्मिती सुरू करण्यात आलेली आहे.
कारखान्याच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे, आपल्या कारखान्याने इथेनॉल प्रकल्पातील स्पेंट वाॅशचा वापर करून पोटॅश खत पावडर निर्मिती सुरू केलेली असून सदर खतामध्ये फाॅस्फेट, आॅरगेनिक कार्बन,मॅग्नेशियम, पोटॅशियम,झिंक, सल्फेट इत्यादी घटक असून या खताचा ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी उपयोग होत आहे.
सदर खताची किंमत सर्व करांसहीत ४ रूपये २० पैसे प्रति किलो प्रमाणे ठेवण्यात आलेली असून सदर खताच्या किंमतीपैकी २ रूपये १० पैसे प्रति किलोप्रमाणे शेतक-याने रोख भरणा करावयाची असून उर्वरित रक्कम शेतक-याच्या कारखान्यास आलेल्या ऊसाचे पेमेंटमधून कपात करण्यात येणार आहे याप्रमाणे धोरण ठरविण्यात आलेले आहे.
ऊस उत्पादक शेतक-यांनी आपली मागणी आपले संबंधित शेतकी गट आॅफीसला नोंदवून खत घेवून जावे असे आवाहन व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.