मराठी राजभाषा दिनानिमित्त शिरूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बक्षीस वितरण ,सन्मान सोहळ्याचे आयोजन
--------------------
मराठी राजभाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शिरूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस बक्षिस वितरण व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी ही माहिती दिली.
शिरूर येथील साई गार्डन मंगल कार्यालयात सोमवार दि.२७ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता मराठी भाषा गौरव दिवस बक्षीस वितरण व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी सांगितले.
कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय सांगताना सय्यद यांनी सांगितले, कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे ,चित्रपटात छोट्या भुमिका करणे, अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य ,प्रभात, नवयुग,धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे ,वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदीराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता.
त्यांच्या क्रांतीकारी कवितांची सुरूवात याच लढ्यापासून झाली. १९३३ साली त्यांनी ध्रव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांनी मदत केली.आपल्या लेखणीमधून सामाजिक अन्याय आणि विषमता या विषयांवर कठोर टिका केली.
कविता,नाटक, कादंबरी,कथा, लघुनिबंध इ.साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. ते आत्मनिष्ठ ,समाजनिष्ठा जाणिव असणारे मराठीतील महत्वाचे लेखक मानले जातात.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे