न्हावरे येथून मारूती वाघमोडे यांची मोटरसायकल चोरीस
शिक्रापूर (प्रतिनिधी):- शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील शेतकरी मारूती भाऊ वाघमोडे यांच्या शेतातून त्यांची मोटरसायकल चोरीस जाण्याची घटना घडली आहे.
१३ आॅक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मारूती भाऊ वाघमोडे वय -४९ रा.न्हावरे यांनी त्यांची काळ्या रंगाची,एम एच १२ डि के ६७८९ या क्रमांकाची हिरो होंडा मोटरसायकल शेती गट क्रमांक ७१९ कामठेवाडी रोडच्या बाजूस उभी केली होती. ती मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. शिरूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार पवार तपास करत आहेत.