• Total Visitor ( 84529 )

मारूती वॅगनर पोटचारीच्या पुलाला धडकून खाली कोसळल्याने ५ जण गंभीर जखमी

Raju Tapal December 09, 2021 28

मारूती वॅगनर पोटचारीच्या पुलाला धडकून खाली कोसळल्याने ५ जण गंभीर जखमी

 

पोटचारीच्या पुलाला धडकून मारूती वॅगनर खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले. 

रोहन लहाडे, विशाल उबाळे, प्रतिक जाधव, राजकुमार जयस्वाल, गोकूळ जाधव वय - २० ते २३ वर्षे रा.वाकड पुणे अशी अपघातातील गंभीर जखमी झालेल्यांची नावे असून हा अपघात पुणे - नाशिक महामार्गावर हॉटेल राज वैभव जवळ बुधवारी दि.८ डिसेंबरला पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान  झाला.

जखमींवर नारायणगाव येथील भोसले रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे सर्वजण संगमनेरवरून पुण्याच्या दिशेला निघाले होते. 

नारायणगाव ओलांडून पुण्याच्या दिशेला जाताना हॉटेल राजवैभव जवळ असणा-या पोटचारीच्या पुलाला धडकून वॅगनर कार क्रमांक  एम एच 14 जे ई 129 गाडी पुलाखाली कोसळली .

Share This

titwala-news

Advertisement