मौजे सोरतापवाडी ता.हवेली येथे जागतिक मृद दिन कार्यक्रम संपन्न
मौजे सोरतापवाडी ता.हवेली जि.पुणे येथे
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ज्ञानेश्वर बोटे साहेब व मा.उप विभागीय कृषी अधिकारी श्री.सुनिल खैरनार साहेब व मा.तालुका कृषि अधिकारी, हवेली श्री मारुती साळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर2021 रोजी सोरतापवाडी ग्रामपंचयत कार्यालयामध्ये मृद दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषि पर्यवेक्षक श्री.मेघराज वाळुंजकर यांनी जागतिक मृदा दिन साजरा करण्याचा उद्देश विशद करुन जमीनीचे आरोग्य,माती परिक्षण, जमीन सुपिकता निर्देशांक,जमीनीची सुपीकता व पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान , सेंद्रिय खतांचा वापर, हिरवळीचे खत वापर,पिकांची फेरपालट,सेंद्रिय कर्ब व जमिनीच्या आरोग्याची काळजी शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन करून सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री. गुलाब कडलग साहेब यांनी सेंद्रिय शेती व जैविक खते व बुरशीनाशके वापराबद्दल माहिती दिली. तसेच जमीनीतील जिवाणुंचे संवर्धन व पिक उत्पादन मधील जिवाणू खतांचा अवलंब बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सेवानिवृत्त प्रकल्प संचालक,आत्मा मा. श्री.विठ्ठलराव करचे साहेबांनी जमिनीचे माती परीक्षण करून सेंद्रिय शेतीचा विकास करण्याबाबत मत मांडले. जैविक शेती व योगिक शेती बाबत मार्गदर्शन करताना विषमुक्त अन्नधान्य, फळपिके व भाजीपाला उत्पादन बाबत मार्गदर्शन केले.तालुका कृषी अधिकारी श्री. मारुती साळे साहेब यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ऊसाचे पाचट न जाळता ते कुजवणे, जमिनीची धूप न होण्यासाठी जमीन सपाटीकरण व बांधबंदिस्ती करणे, मग्रारोहयो अंतर्गत बांधावरील फळबाग लागवड करणे, क्षारांचे प्रमाण वाढू नये म्हणून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकाच्या गरजेनुसार पाणी देणे अशा प्रकारे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन मृद् संवर्धन करावे असे आवाहन केले. यावेळी युवा नेते अमित चौधरी, दीपस्तंभ शेतकरी भाऊसाहेब चौधरी, कृषी मित्र सुनील चौधरी, सुभाष कड, राहुल चोरघे, पांडुरंग म्हस्के, सोपान चौधरी, अभिजित गाढवे इत्यादी प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी सूत्रसंचालन करत असताना त्यांनी पिक उत्पादन मधील मातीचे महत्त्व तसेच जमीनीचे धुप नियंत्रण करुन उपलब्ध पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले व कृषी सहाय्यक शंकर चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.