मौजे वडकी येथे कृषिभवन कार्यालयाचा भुमिपुजन कार्यक्रम संपन्न
मौजे वडकी ता.हवेली जि.पुणे येथे शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा बहुउद्देशीय कार्यालयाचे भुमिपुजन पुरंदर-हवेलीचे आमदार श्री.संजय जगताप ,यांच्या हस्ते व सरपंच श्री.अरुण गायकवाड ,उपसरपंच शितल मोडक यांच्या उपस्थितीत दिनांक १२/१२/२०२१रोजी करण्यात आले. खासदार सुप्रियाताई सुळे व .आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना गावपातळीवरच सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने कृषि भवन या कार्यालयाची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
कृषिभवनाच्या इमारतीवर वीज व्यवस्थेसाठी सोलर पॅनेल व पर्जन्यमापक यंत्र, अत्याधुनिक संगणक प्रणाली व इंटरनेट सुविधा, बाजारभाव माहिती केंद्र,कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात येणार, शेतकरी बचत गट निर्मिती,पिक विमा व फळपिक विमा योजना, शेतकरी अपघात विमा,माती परिक्षण,पिक प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी सहल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग,क्रापसॅप अंतर्गत पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व नियंत्रण बाबत सल्ला व मार्गदर्शन, जलसंधारण,कृषि,अन्नप्रक्रिया संबंधीत तज्ञ व्यक्तींचे व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे मार्गदर्शन,ओव्हर हेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण, कृषिविषयक अॅग्रोवन दैनिक, कृषिविषयक विविध साप्ताहिके,मासिके, शेतकरी मासिक, कृषिविषयक विविध पुस्तके उपलब्धता,कृषि विभागाच्या कृषि यांत्रिकीकरण योजना,सुक्ष्मसिंचन योजना, सिंचन सुविधा व साधने,कृषि विस्तार व प्रशिक्षण, फलोत्पादन,कृषिप्रक्रिया , कृषि निविष्ठा बियाणे, खते, किटकनाशके, बुरशीनाशके,ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम,सेंद्रिय शेती प्रकल्प,विकेल ते पिकेल , शेतकरी ते ग्राहक व इतर सर्व योजनांचा लाभ व आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा या एकाच ठिकाणी कृषीभवन कार्यालयात अत्याधुनिक सेवा सुविधा शेतक-यांसाठी उपलब्ध होणार आहेत.तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे कृषि सहाय्यक व गावपातळीवरील कृषि मित्र यांची बैठक व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी सुसज्य असे शेतकरी प्रशिक्षण केंद्रा साठी आवश्यक अशा सर्व सोयी सुविधा कृषि भवन मध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी ,कृषि मालाचे मुल्यवर्धन व्हावे ,शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी याउद्देशाने सदर कृषि भवन या कार्यालयाची उभारणी गावपातळीवर केली जाणार असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी या कार्यक्रमात दिली. मा.मारुती साळे , तालुका कृषि अधिकारी, हवेली यांनी उपस्थित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ महाडीबीटीच्या माध्यमातून घेण्याचे आवाहन करुन कृषि भवन कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधा व विविध कृषि विषयक योजना उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
सदर कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी श्री.गुलाब कडलग,कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ श्री.मेघराज वाळुंजकर,कृषि सहाय्यक श्रीमती पुष्पा जाधव यांनी कृषि भवन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळुन देण्यासाठी मंडळ कृषि अधिकारी कार्यालय हडपसर हे कटिबद्ध असेल अशी ग्वाही दिली.
श्री. सुनिल गायकवाड,माजी उपसरपंच यांनी मौजे वडकी येथील राबविण्यात आलेल्या व सद्यस्थितीत सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती देऊन भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास कामांना आमदारांनी प्राधान्याने वडकी गावाचा विचार करुन भरीव तरतुद करुन गावाचा विकास साधन्यास मदत करण्याची विनंती ग्रामस्थांच्या वतीने केली.
सरपंच,श्री.अरुण गायकवाड यांनी वडकी ग्रामपंचायत च्या माध्यमातून व सर्व सदस्यांच्या सहकार्याने विविध विकास कामे करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले.गावातील सर्व रस्त्यांची कामे सुशोभीकरणासह, रोडलगत विविध झाडांची लागवड करण्यास प्राधान्य देण्यात येईल. कृषि भवन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायत विशेष प्रयत्न करेल व शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळुन देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सहकार्य करील.भविष्यात येत्या चार वर्षांत गावातील सर्व उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय प्रयत्न करुन कोणतेही काम शिल्लक राहणार नाही याची खबरदारी घेईल.
सदर कार्यक्रमास पुरंदर तालुका कृषि अधिकारी श्री.सुरज जाधव हे उपस्थित होते .आमदार संजय जगताप यांच्या हस्ते व वडकी ग्रामपंचायत,ग्रामस्थांमार्फत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. पुरंदर तालुका काॅग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदिप पोमण श्री. मच्छिंद्र गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, सौ. नेहा मोडक, सौ.कावेरी मोडक,श्रीमती वैजयंता मोडक,सौ. योगिता गायकवाड,सौ.कविता चव्हाण,सौ.विद्या लडकत, श्री.सागर मोडक, ग्रामपंचायत सदस्य,श्री.मोहन मिसाळ, ग्रामविकास अधिकारी , माजी सरपंच सौं. रेश्मा मोडक ,माजी उपसरपंच,श्री.सचिन गायकवाड,श्री बाळासाहेब साबळे,प्रगतशील शेतकरी व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्य श्री. दिलीप गायकवाड यांनी केले.तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन मोडक यांनी आभार मानले.