मेडिकलचे शटर उचकटून चोरी करणा-या सराईत चोरट्यास बारामती शहर पोलीसांनी अटक केली.
आकाश विठ्ठल पाटोळे असे सराईत चोरट्याचे नाव आहे.
मेडिकलचे शटर उचकटून आत जाताना नागरिकांनी पाहिल्यानंतर तात्काळ बारामती पोलीसांना माहिती देण्यात आली.
बारामती शहर पोलीस त्याठिकाणी पोहोचले असता आरोपी हा भिंतीवरून उडी मारून पळून जात असताना खाली पडून जखमी झाला .
त्याला पोलीसांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
आरोपी आकाश पाटोळे याने पाटील मेडिकल मोतीबाग बारामती येथे चोरी करण्यात आल्याची कबूली दिली.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरामध्ये घरफोडीचे २१ गुन्हे दाखल आहेत.
आरोपी आकाश पाटोळे याच्याकडून रोख २१०० /- रूपये तसेच पुणे शहरातून चोरी केलेली पांढ-या रंगाची स्कुटी जप्त केली.
सहाय्यक पोलीस फौजदार अरूण रासकर पुढील तपास करत आहेत.