मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या ७ विद्यार्थ्यांचा सेलसुरा येथे अपघाती मृत्यू
मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या ७ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली.
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तिरोडा गोरेगाव भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा आविष्कार रहांगडाले याचा समावेश आहे.
वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा येथे पुलावरून झायलो वाहन ४० फूट खाली कोसळून हा भीषण अपघात मंगळवारी सकाळी झाला.
मृतांमध्ये नीरज चव्हाण गोरखपूर, विवेक नंदन गया, पवनशक्ती गया, आविष्कार रहांगडाले तिरोडा, प्रत्यूशसिंग गोरखपूर , शुभम जयस्वाल चंदोली, नितेशकुमार सिंग, ओडिशा यांचा समावेश आहे.
हे सर्व वैद्यकीय शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी होते.
भरधाव वेगात असलेली झायलो गाडी दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एका ट्रकचालकाने सावंगी पोलीसांना माहिती दिल्यानंतर पहाटे पोलीस घटनास्थळी पोहोचले.
मृत नितेशसिंग यांच्या मालकीची ही गाडी होती असे समजते.