म्हारळ वरप कांबा रस्ता खडड्यात
दरवर्षी प्रमाणे याही वेळी म्हारळ पाडा, वरप,कांबा,पाचवामैल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले असून यामुळे कल्याण मुरबाड महामार्गावर तूफान वाहतूक कोंडी होत आहे. या भागातील आमदार, खासदार, मंत्री सत्तेच्या सारीपाटात मस्त रमले असून जनता मात्र दिवसेंदिवस त्रस्त झाली आहे.
कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळ, पाडा, वरप मधील, ओमकार नगर, सिमा रिसाँर्ट, बंजरग हार्डवेअर, दुर्गानगर, मारुती मंदिर, सिक्रेट हार्ट स्कूल, टाटा पावर,पेट्रोल पंप, कांबा बस थांबा, पुढे पावशेपाडा, पाचवामैल येथे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असायचे, परंतु मागील वर्षी शहाड उड्डाणपूल ते म्हारळ पाडा येत पर्यंत सिमेंट क्राँक्रिटीकरण केल्याने येथे खड्डे नाहीत, परंतु पुढे रस्त्याचे काम सुरू असल्याने आता खड्यांच्या बरोबरच चिखल देखील मोफत आहे, त्यामुळे खड्डय़ामुळे मान,कंबर दुखीसह कपड्यावर रंगरंगोटी देखील होत आहे, तर या परिसरातील खड्ड्यात या भागातील लोकप्रतिनिधी ना गाडावे लागेल अशी संतापजनक प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राम भोईर यांनी दिली.