म्हसे वाडीत रस्ताच नसल्याने गावकरी मेटाकुटीला
विक्रमगड तालुक्यातील मलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील म्हसेपाडा येथे जाणारा रस्ता वनविभागाच्या जागेतुन जात असल्याने वाडा तालुक्यातील गारगाव ग्रामपंचायत हद्दीतील टोपलेपाडा ते म्हसेपाडा हा रस्ता यापुर्वीच ३ वेळा मोजमाप घेवुन पंचायत समिती बांधकाम विभाग वाडा यांनी प्रस्तावासहित ही फाईल वन विभागाच्या मंजुरीसाठी वाडा वनविभाग वाडा पुर्व यांच्याकडे देवुन ९० टक्के कागदोपत्री काम झाले होते फक्त राहलेले १० टक्के फॉरेस्ट परवानगी राहली होती, परंतु काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाडा पुर्व वनविभाग यांच्याकडे जावुन आपल्या वनविभागातुन जाणाऱ्या रस्त्यांची पुन्हा मोजमाप घेण्यात यावे अशी मागणी करुन लवकर होणाऱ्या कामास अडथळा आणण्याचे काम केले,आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने ३ वर्षापासुन अतीदुर्गम भाग असलेल्या व दोन नद्यांच्या पलीकडे वसलेला म्हसे पाडा या गावात ये -जा करण्यासाठी कुठल्याही प्रकारे सुविधा नाही पंचायत समिती वाडा व वनविभागाकडे सतत निवेदने देवुन व पाठपुरावा करुन कागदोपत्री ९० टक्के काम झाले आहे,तरी आज पंचायत समिती वाडा बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व वाडा पुर्व वनविभागाचे अधिकारी यांच्या विनंतीनुसार म्हसे पाडा ते टोपलेपाडा रस्ताचे मोजमाप घेताना हजर होते. सुरुवाती पासुन हा रस्ता व्हावा म्हणुन गावकऱ्यांच्या बाजुने होतो व यापुढेही रस्ता होईल तोपर्यत प्रयत्न करत राहणार . बुधवारी म्हसेपाडा ते टोपलेपाडा रस्ताचे मोजमाप घेत असताना आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा , पालघर जिल्हा कमिटी अध्यक्ष अरुण खुलात, वाडा पुर्व वनविभागाचे अधिकारी व पंचायत समिती वाडा बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व म्हसे पाडा येथील स्थानिक नागरीक उपस्थित होते.