मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
Raju Tapal
December 06, 2021
41
बोलठाण येथील मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे जनसेवा मित्र मंडळाचे मनोज भाऊ रिंढे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
नांदगाव तालुक्यातील बोलठाण ग्रामपंचायत कार्याल-
यात श्री छत्रपती शिवाजी महाराज जण सेवा मित्र मंडळ बोलठाण व निलवसंत मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यांचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन बोलठाण ग्रामपंचायतीचे व छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ बोलठाण चे मनोज भाऊ रिंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
डोळा हा एक असा अवयव आहे की, त्याद्वारे आपण सर्वांना सुट्टी जाणीव होत असते. यासाठी आपल्या डोळ्यांची योग्य ती काळजी दिसली पाहिजे असे उद्देशून मनोज रिंढे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या शिबिरात निलवसंत मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर अशोक यांच्या डॉक्टरांनी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली.. तपासणी एकूण 131
रुग्णांची नागरिकांची डोळ्यांची तपासणी केली. तर 56 लोकांचे डोळ्याच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या वेळी मनोज रिंढे, सुभाष गंडे, संजय पाटील, प्रल्हाद रिंढे, योगेश काकडे, कैलास रिंढे, बोलठाण ग्रामपंचायतीचे वाल्मीक गायकवाड ग्रामसेवक भगवान जाधव प्रतीक पठाण, व गावातील पदाधिकारी कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Share This