मोहिते महाविद्यालया मध्ये प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा...
Raju Tapal
January 27, 2022
51
मोहिते महाविद्यालया मध्ये प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा
खोडाळा:- खोडाळा विभागातील सर्वात मोठे महाविद्यालय असलेले मोहिते महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन यावेळी साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, व प्रशासकीय सेवेतील विविध जनांना यात आमंत्रित करण्यात आले होते
यात जवान,सैनिक कारगिल योध्दा धोंडमारे सर व मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांच्या हस्ते द्धवजावंरण करण्यात आले यावेळी सरपंच प्रभाकर पाटील,उपसरपंच मनोज कदम,सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे,भारतीय विद्यार्थी संघटनेचे सचिन पाटील,माजी सभापती प्रदीप वाघ ,एकनाथ झुगरे,महाविद्यालयाचे भाऊ साहेब मोहिते सर ,सचिव प्रा.दिपक कडलक सर,प्रा.निकिता वारघडे,उपप्राचार्य प्रा. शिद सर,प्रा.रोकडे सर इत्यादी मान्यवर व विद्यार्थी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी मोहिते महाविद्यालयातील झालेल्या कामगिरी चा आढावा हा प्रोजेक्ट द्रौरे दाखवण्यात आला व सदर कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.शिगवे सर यांनी केली व कार्यक्रमाचे आभार प्रा.दिपक कडलक सर यांनी केले..
Share This