मोरया कॉलनी,विष्णु भोईर चाळ परिसरात पायवटा व गटारे कामांचा शुभारंभ
माजी आमदार नरेंद्र पवार यांचे प्रयत्न
टिटवाळा येथील मांडा पुर्व सावरकर नगर मधील मोरया कॉलनी व विष्णु भोईर चाळ ते एकदंत बिल्डिंग पर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली होती, तसेच गटारे नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खुपच त्रास सहन करावा लागत होता. या भागातील भाजप कार्यकर्ते यांनी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणली. त्यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे सदर कामाच्या बाबत निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केरळचे राज्यसभा खासदार यांच्या खासदार निधीतून पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करून घेतला.
सदर कामाच्या भुमिपुजन समयी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष परेश गुजरे,हभप सांगळे महाराज, मोहना टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोईर, महिला अध्यक्ष सारीका पाटील, जेष्ठ कार्यकर्ते नारायण मिरकुटे,वॉर्ड अध्यक्ष दीपक कांबळे, अमोल केदार, संतोष शिंगोळे,हेमंत गायकवाड,विनायक भोय,आनंता पाटील, दशरथ पाटील, स्वप्ना दिक्षीत,विनोद इंगळे यांच्या सह महिला आघाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.