मोरया गोसावी भगवंताशी एकरूप झालेले उच्च दर्जाचे संत
महासाधू श्री मोरया गोसावी भगवंताशी एकरूप झालेले उच्च दर्जाचे संत होते असे मत कोल्हापूर करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांनी व्यक्त केले.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट व पिंपरी चिंचवड महापालिका ,ग्रामस्थांच्या वतीने आयोजित महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे.शंकराचार्य यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुर्ती पुजन व दीप प्रज्वलनाने महोत्सवास सुरूवात करण्यात आली.
महापौर उषा ढोरे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभय टिळक, संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संत सोपानदेव महाराज संस्थानचे अध्यक्ष त्रिकूणमहाराज गोसावी, म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा माधुरी भेलके, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ,
उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, देवस्थानचे विश्वस्त विश्वस्त देव हे याप्रसंगी उपस्थित होते.
श्री गणेशाची सर्व माहिती असलेल्या दिनदर्शिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. पंडीत जसराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह यावेळी बोलताना म्हणाले गणपती अथर्वशीर्ष केवळ पाठ करणे गरजेचे नाही त्याचे अंतरंग बघितले पाहिजे. सत्यता, श्रद्धा बळकट असणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना महापौर उषा ढोरे म्हणाल्या, महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव पिंपरी चिंचवड शहराचे भुषण आहे. मोरयांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.चिंचवड गावात सतत होत असलेल्या धार्मिक कार्याक्रमांचा आपल्याला अभिमान आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त विनोद पवार यांनी केले.
विश्वस्त विश्वास देव यांनी ट्रस्टच्या उपक्रमांची तसेच कोरोना कालावधीत केलेल्या कामांची माहिती यावेळी दिली. अनिल साळवे यांनी सुत्रसंचलन केले. विश्वस्त ह.भ.प. आनंद तांबे यांनी आभार मानले.