खासदार किरीट सौम्मया यांची कल्याण तहसीलदार कार्यालयाला भेट
जात प्रमाणपत्र बाबत केली चर्चा
खासदार किरीट सौम्मया यांनी कल्याण तहसीलदार सचीन शेजाल यांची भेट घेऊन जात प्रमाणपत्रे बाबत चर्चा केली जातीचे दाखले देतांना योग्य ती कागदपत्रे व पुरावे तपासणी करावी असे निदर्श दिले आहेत.
याबाबत खासदार किरीट सोम्मया यांनी सांगितले की महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात भेट देऊन तहसीलदार यांच्याकडे बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती तसेच जात प्रमाणपत्रे यांच्या विषयी माहिती घेतली आहे, त्या प्रमाणे कल्याण तहसीलदार सचिन शेजाल यांची भेट घेऊन व जातप्रमाणपत्रे बाबत माहिती घेतली. ज्यांचा जन्म भारतात झाला नसतानाही अशा दोन लाख नागरिकांना जात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत याबाबत सर्व जिल्हा अधिकारी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच मुख्यमंत्री यांनाही तसेच सांगितले आहे. दोन राजकीय पुढारी, दोन अतिरेकी संघटना व दोन बांगलादेशी संघटनेचा समावेश आहे असे सांगितले.