एम पी एस सी ची परिक्षा देत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या
दौंड तालुक्यातील देऊळगावा गाडा येथील एम पी एस सी ची परिक्षा देत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि.१७/१२/२०२१ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
मल्हारी नामदेवराव बारवकर वय - २५ असे राहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मल्हारी बारवकर या विद्यार्थ्याने एम पी एस सी चे तीन पेपर दिले होते.
एम पी एस सी परिक्षेची पूर्वतयारी करत असताना नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे समजते.
मल्हारी बारवकर या विद्यार्थ्याचे चुलते महादेव पांडूरंग बारवकर यांनी या घटनेची फिर्याद यवत पोलीस ठाण्यात दिली.
पोलीस निरीक्षक नारायण पवार या घटनेचा तपास करीत आहेत.