श्री. संत गजानन महाराजांचा १४७ वा प्रकटदिन सोहळा राऊतवाडीत संपन्न
शिरूर:- हे गुरु गजानना,
नाही येता आले शेगावा
दर्शन दे शिक्रापूरा
या आर्त भावनेने ओत प्रोत झालेल्या भक्तांच्या उपस्थितीत श्री संत गजानन महाराजांचा १४७ वा प्रकट दिन सोहळा माघ कृ सप्तमी गुरूवार दि.२०/०२/ २०२५ रोजी राऊतवाडी, शिक्रापूर येथे संपन्न झाला. महाराजांनी त्यांच्या अवतार कार्यात अनेक भक्तांचा उद्धार केला व त्यांना भक्ती मार्गाला लावले त्याच अनुभूतीतून ठिकठिकाणाहून आलेल्या भक्त मंडळींनी गजानन महाराज मंदिर राऊतवाडी, शिक्रापूर येथे दर्शन ,आरती, सामूहिक बावन्न पठण व महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे सहकुटुंब उपस्थित होते त्यांनी मोठ्या आस्थेने व आपुलकीने येणाऱ्या भक्तांचे अनुभव जाणून घेतले.त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ राऊत व सेवा समितीतील सदस्यांशी संवाद साधून त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. सेवकांनीही सेवेतून समाधान ही महाराजांची शिकवण अंगी बाळगून धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सरपंच गडदे यांनी यथोचित शक्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.
सेवा समितीतील सदस्य संदीप खर्चे यांनी भक्तीभावाने काढलेली श्रीं ची रांगोळी ही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती ती सेवा समितीतील प्रत्येक सदस्याच्या सेवेप्रतीचा भाव व्यक्त करत होती.
शिवव्याख्याते शरद दरेकर पाटील व अन्य मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर )