बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण (प.) येथे MRI सुविधा सुरु
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे आज दि. ०८/१०/२०२५ रोजी पासून मे. क्रस्ना डायग्नोस्टीक्स लि. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने MRI सुविधा सुरु करण्यात आली आहे. मे.क्रस्ना डायग्नोस्टीक्स लि. यांना बाई रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे रेडीओलॉजी व पॅथोलॉजी सुविधा सुरु करण्यासाठी कार्यादेश देण्यात आले होते व जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे सन २०२० पासून MRI, CT Scan, सोनोग्राफी व एक्स-रे सुविधा आणि पॅथोलॉजी तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे देखील CT Scan, सोनोग्राफी व एक्स-रे सुविधा आणि पॅथोलॉजी तपासणी सुविधा उपलब्ध होती परंतु MRI सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय, डोंबिवली येथे जावे लागत होते. आता सदर सुविधा कल्याण मध्येच उपलब्ध झाली आहे. General Electric कंपनीची सदर MRI मशीन १.५ टेस्ला, ६४ चॅनल्स क्षमतेची असून २४x७ ही सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच MRI झाल्यानंतर ४ तासांमध्ये तर इमर्जन्सी केस मध्ये २ तासांमध्ये रिपोर्ट उपलब्ध होणार आहे.तसेच सवलतीच्या दरामध्ये (CGHS + ८ % ) सदर सर्व तपासण्या रुग्णांना उपलब्ध होतील अशी अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे.