सप्टेंबर २०२० पर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांनाच ३० टक्के सुट,विलंब आकार ,व्याज माफ ; शिक्रापूर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता नितीन महाजन यांची माहिती
----------------
सप्टेंबर २०२० पर्यंत कृषीपंपाची थकबाकी असलेल्या शेतक-यांनाच ३० टक्के सवलत,विलंब आकार, व्याज माफ करण्यात येत असल्याचे शिक्रापूर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी स्पष्ट केले.
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांच्याकडे महावितरणची शेतीपंपाची ३५७४०/- रूपये थकबाकी होती. त्यापैकी १०७३०/- रूपये ५/१२/२०२२ रोजी ढमढेरे यांनी भरले होते. २५०१०/- रूपये थकबाकी राहिली होती.
२५०१०/- रूपये थकबाकी असल्याने महावितरण कर्मचा-याने तीन दिवसांपूर्वी शेतकरी विजय ढमढेरे यांच्यासह इतरही शेतक-या़ंच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला.
दरम्यान, सप्टेंबर २०२० पासून आजपर्यंत असणा-या थकबाकीदार शेतक-यांना महावितरणकडून ३० टक्के सवलत मिळणार असून ही सवलत योजना ३१ मार्च २०२३ पर्यंतच असून १ एप्रिलनंतर या थकबाकीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही ही एका वर्तमानपत्रातील बातमी कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांच्या वाचनात आल्याने शेतकरी विजय ढमढेरे यांनी थकबाकी Nil करण्याच्या दृष्टीने त्या़ंच्याकडे असलेल्या २५०१०/- रूपये थकबाकीपैकी किती रूपये भरावे लागतील ? हे समजत नाही. २५०१०/- रूपये थकबाकी असलेल्या वीजबीलाला ३० टक्के सवलत, विलंब आकार,व्याज माफ आहे का ? अशा आशयाचा विनंती अर्ज मेलद्वारे शिक्रापूर येथील महावितरण कार्यालय अधिका-यांकडे दि.१२/०२/२०२३ रोजी केला होता.
१४/०२/२०२३ रोजी शेतकरी विजय ढमढेरे यांनी शिक्रापूर येथील महावितरण कार्यालयात जावून महावितरणचे कार्यकारी अभियंता नितीन महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेवून २५०१० रूपये थकबाकी असलेल्या शेतीपंपाच्या वीजबिलाला ३० टक्के सवलत, व्याज,विलंब आकार माफीबाबत विचारले असता ३० टक्के सवलत ,विलंब आकार ,व्याज माफ ही योजना सप्टेंबर २०२० पर्यंत थकबाकीदार शेतक-यांसाठीच असून ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणा-या शेतक-यांसाठीच ही योजना असल्याचे महावितरणचे शिक्रापूर येथील कार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी स्पष्ट केले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628