लाईनमनदिनानिमित महावितरणचे जनमित्र लक्ष्मण खरसडे यांचा कर्तव्यतत्परतेबद्दल कोंढापुरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
--------------------
लाईनमन दिवसाचे औचित्य साधून महावितरणचे जनमित्र लक्ष्मण खरसडे यांनी वेळोवेळी दाखविलेल्या कर्तव्यतत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी ग्रामस्थांच्या वतीने जनमित्र, लाईनमन लक्ष्मण खरसडे यांचा आज दि.४ मार्च २०२३ रोजी माजी सरपंच, सोसायटीचे संचालक स्वप्निल गायकवाड,उपसरपंच सुनिल गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी ग्रामपंचायत चौकाजवळील वार्ड क्रमांक - २ मधील एका वीजखांबावरून दुस-या वीजवाहक खांबावर जाणारी वीजवाहक तार अचानक तुटून खाली लोंबकळत असल्याची घटना ७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली होती.
अचानक तुटलेल्या वीजवाहक तारांमधून ठिणग्या उडत होत्या. वीजवाहक तार अचानक तुटून ठिणग्या उडत असल्यामुळे ग्रामपंचायत चौकात बसलेल्या ,वार्ड क्रमांक - २ मधील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती.या घटनेचे गा़ंभीर्य ओळखून टिटवाळा न्यूज,मराठी १ न्यूजचे प्रतिनिधी,पत्रकार विजय ढमढेरे यांनी तातडीने महावितरणचे कर्मचारी,जनमित्र ,लाईनमन लक्ष्मणराव खरसडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून तुटलेल्या वीजवाहक तारेच्या घटनेची कल्पना दिली. जनमित्र ,महावितरणचे कर्मचारी लक्ष्मण खरसडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तुटलेल्या वीजवाहक तारेची पाहणी करून विद्यूतरोहित्रातील फ्यूज काढून प्रसंगावधान दाखवत त्यांच्या पद्धतीने तुटलेल्या वीजवाहक तारेची दुरूस्ती केली.
१४ मार्च २०२२ रोजी घडलेल्या दुस-या घटनेत कोंढापुरी येथील पाझर तलावाच्या बंधा-याखाली,खंडोबा मंदीराजवळून खंडाळे गावाकडे जाणा-या रस्त्यालगत असलेल्या वीजखांबावरील मेनलाईनची न्युट्रल वीजवाहक तार आठवडाभराच्या अंतराने अचानक तुटून खाली लोंबकळण्याची दुसरीही घटना घडली होती.
कोंढापुरी येथील शेतकरी, टिटवाळा न्यूज,मराठी १ न्यूजचे प्रतिनिधी,पत्रकार विजय ढमढेरे हे त्यांघ्या शेतातून घराकडे परतत असताना तुटलेल्या वीजवाहक तारेची कल्पना आल्यानंतर ढमढेरे यांनी यावेळीही भ्रमणध्वनीवरून जनमित्र,महावितरणचे कर्मचारी लक्ष्मण खरसडे यांना कल्पना दिली. यावेळीही क्षणाचाही विलंब न लावता १० मिनिट अंतराच्या फरकाने खरसडे यांनी घटनास्थळी येवून तुटलेल्या मेनलाईनच्या वीजवाहक तारेची पाहणी केली. विद्यूतरोहित्रातील फ्यूज काढून तुटलेली वीजवाहक तार पुन्हा जोडण्याचे काम करून यावेळीही कर्तव्यतत्परता दाखविली.
टिटवाळा न्यूजने या दोन्हीही घटनांचे वृत्त दि. ८/०३/२०२२ रोजी तसेच दि.१४/०३/२०२२ रोजी प्रसारित केले होते.
टिटवाळा न्यूजने प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल कोंढापुरी ता.शिरूर येथील ग्रामस्था़ंनी घेवून आज दि.४/०३/२०२३ रोजी लाईनमन दिवसाचे औचित्य साधून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरणचे लाईनमन , जनमित्र लक्ष्मण खरसडे, रामेश्वर ढाकणे यांचा माजी सरपंच ,सोसायटीचे संचालक स्वप्निल गायकवाड,उपसरपंच सुनील गायकवाड यांच्या हस्ते ग्रामपंचायत पदाधिकारी,सोसायटीचे पदाधिका-यांच्या उपस्थितीत सत्कार केला.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे