महावितरणकडून शेतक-यांना रात्रपाळीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत प्राप्त झालेल्या निवेदनाचे अवलोकन करावे ; तहसिलदार गृह शाखा तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी धनंजय जाधव यांचे पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मुख्य अभियंता महावितरण पुणे झोन, अधिक्षक अभियंता महावितरण बारामती ग्रामीण मंडल यांना पत्र
-----------------
शिरूर तालुक्यातील महावितरणने कोट्यवधी युनिट बोगस वापर दाखवून शेतक-यांची केलेली लूट, वीजचोरी, सबसिडी अपहार प्रकरणी शिरूर,शिक्रापूर,रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून महावितरणकडून शेतक-यांना रात्रपाळीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत संजय शिवाजी पाचंगे जिल्हाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हा रा.शिरूर जि.पुणे यांचे या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या निवेदनाचे अवलोकन होण्यास विनंती असे तहसिलदार गृह शाखा तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी पुणे धनंजय जाधव यांनी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण ,मुख्य अभियंता महावितरण पुणे झोन , अधिक्षक अभियंता महावितरण बारामती ग्रामीण मंडल यांना कळविलेल्या पत्रात म्हटले आहे.
निवेदनकर्ते संजय पाचंगे यांनी सदर निवेदनात शिरूर तालुक्यातील महावितरणने कोट्यवधी युनिट बोगस वापर दाखवून शेतक-यांची केलेली लूट , वीजचोरी, सबसिडी अपहार प्रकरणी शिरूर,शिक्रापूर,रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून महावितरणकडून शेतक-यांना रात्रपाळी ऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत नमुद केलेले आहे. सदर निवेदन सोबत जोडून पुढील उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येत आहे. सदर निवेदनातील विषयांच्या अनुषंगाने नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रात म्हटले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर जि.पुणे