शिक्रापूर येथे मुकपदयात्रेचे आयोजन
शिरूर :- धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त,३३६ व्या बलिदान दिनानिमित्त शनिवार दि.२९/०३/२०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिक्रापूर येथे मुकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामदैवत भैरवनाथ मंदीर परिसर शिक्रापूर याठिकाणी अखंड हिंदुस्थानचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री. संभाजीमहाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कर्तव्य म्हणून सर्वांनी मुकपदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन शिक्रापूर येथील शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे