• Total Visitor ( 133522 )

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात;

Raju Tapal January 31, 2023 68

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात;
कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई:-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.कार आणि लग्झरी बसची धडक होऊन अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक बसली आणि हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या मार्गावर हा अपघात झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहुन मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला. कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारची लग्झरी बसला धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघात कासा पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मीजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू केलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी सर्व मतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
अपघात झाल्यानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व माहिती घेऊन वाहतूक तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघातग्रस्त वाहानं क्रेनच्या मदतीनं महामार्गावरुन बाजूला करण्यात आली. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

Share This

titwala-news

Advertisement