टिटवाळा येथे राहणारे तसेच महानगरपालिका शिक्षक सेनेचे सहचिटणीस के.के.केंद्रे यांनी शनिवारी कामावरून आल्यावर टिटवाळा स्टेशनला उतरून नेहमीप्रमाणे पायी चालत असताना अभिदर्शन सोसायटी गेट जवळ त्यांना रस्त्यात एक पॉकेट सापडले त्यामध्ये बरीच रोखरक्कम,डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,पॅन कार्ड,आधार कार्ड दिसले.आधार कार्ड हातात घेऊन पाहिले असता त्यावर मोबाईल क्रमांक होता.त्या क्रमांकावर त्यांनी खुप वेळा कॉल केला पण रिंग जात नव्हती. सदरचे पाकीट हे आशिष सोनजे यांचे होते. सोशल मीडियाच्या मदतीने
आशिष सोनजे याना प्रत्यक्ष भेटून पाकीट देण्यात आले.