विमानतळावर 9 प्रवाशी कोरोनाबाधित आढळले,
दोन जण BQ.1.1 बाधित
चीननंतर अमेरिकेतही कोरोना महामारीनं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.त्या पार्श्वभूमीवर जगभरातील देश सतर्क झाले आहेत. कोरोनाचा धोका वाढता भारताने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विमानतळवर आतंरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. मुंबई विमानतळावरही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत मुंबई विमानतळावर 9 प्रवाशी कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी दोन प्रवाशी BQ.1.1 या सब व्हेरियंटने बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत परदेशातून आलेले नऊ प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉन BQ 1.1 या सब व्हेरियंटचे रुग्ण आहेत. तर इतर सात जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाईन्सनंतर 24 डिसेंबरपासून आरटीपीसीआर कोरोना चाचणी परदेशातून आलेल्या नागरिकांची केली जात आहे. मुंबई विमानतळावर आलेल्या परदेशातील नागरिकांपैकी आतापर्यंत नऊ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळे आहेत. यातील एक 16 वर्षीय लंडनहून आलेला पुरुष प्रवासी आणि स्विझर्लंडवरून आलेली पंचवीस वर्षे महिला प्रवासी या दोघांमध्ये ओमायक्रॉन BQ.1.1 व्हेरियंट आढळला आहे.तरी इतर मॉरिशस ,लंडन, दोहा ,इजिप्त, मस्कत व्हिएतनाम आणि रियाज या ठिकाणाहून आलेल्या सात प्रवाशीही कोरोना पॉझिटिव आढळले आहेत. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सीसाठी पाठवण्यात आले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यातील पाच कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत चार प्रवाशी कोरोनाबाधित आढळले आहेत.
राज्यात आज किती रुग्णांची नोंद?
महाराष्ट्राच आज 32 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आज ३० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८८,२२८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७% एवढे झाले आहे.
देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण -
देशात XBB.1.5 व्हेरियंटचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील XBB व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे. गुरुवारी INSACOG च्या आकडेवारीनुसार, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये XBB व्हेरियंटच्या नवीन दोन रुग्णांची नोद झाली आहे. तर गुजरातमध्ये तीन आणि कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.