महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी केली उधानाची पाहणी व जेष्ट नागरिकांशी साधला संवाद
कल्याण :- कल्याण डोंबिवली महापालिकाआयुक्त डॉ इदुराणी जाखड यांनी राणी लक्ष्मीबाई उद्यान सुशोभीकरण व सौंदर्यकरण कामाचा पाहणी दौरा व राणी लक्ष्मीबाई जेष्ठ नागरिक मंडळास सदिच्छा भेट दिली,
माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विणाताई जाधव यांच्या सातत्या पाठपुराव्याने उधानासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, विविध कामे सुरू आहेत, कल्याण पश्चिम भागात सुसज्ज असे उधान आता सवौसाठी होणार आहे,
उद्यानाच्या सौंदर्यकरण व सुशोभीकरण कामाची पाहणी केली तसेच राणी लक्ष्मीबाई उद्यान जेष्ठ नागरिक मंडळातील ज्येष्ठ सभासदांची सुसंवाद साधला सदर कार्यक्रमास आयुक्त डॉ इंदू राणी जाखड, उपायुक्त संजय जाधव, सिडको माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव ,माजी नगरसेवक गणेश जाधव,माजी सभापती महिला व बालकल्याण विना जाधव ,आर्किटेक्ट भोसले , राणी लक्ष्मीबाई जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष किशोर दिवटे ,उपाध्यक्ष शबापू महाजन, अनुराधा भुजबळ सचिव विजया शिंदे व कार्यकारणी सदस्य तथा ज्येष्ठ सभासद बहुसंख्येने उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांतर्फे विजया शिंदे अनुराधा भुजबळ व किशोर दिवटे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रमोद हिंदुराव, गणेश जाधव यांनी प्रभागातील समस्या बाबत विवेचन करून उद्यानातील प्रगतीत असलेल्या सौंदर्यीकरण कामाबाबत व आकांक्षी शौचालयाचा कामाबाबत समाधान व्यक्त केले माननीय आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी उपस्थितांचे सुसंवाद साधला व ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासित केले तसेच उद्यानात सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किशोर दिवटे यांनी केले तसेच अर्चना टाकळकर यांनी पसायदान करून कार्यक्रमाची सांगता.