नगर कल्याण रस्त्यावर लक्झरी बस ला अपघात प्रवासी सुखरूप
कल्याण नगर महामार्ग रस्त्यांवर लक्झरी बस एका पुलावर धडकल्याने अपघात झाला आहे.
नगर वरून रात्री तीन वाजता नवीमुंबई येथे 60 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला प्रांजली हाॅटेल जवळ अपघात झाला असून यात प्रवासी सुखरूप बचावले आहेत.ही बस नगर वरून रात्री 10 वाजता निघाली होती ही माळशेज घाट मार्ग नवीमुंबई येथे जात असताऺना एक अनोळखी वाहन अंगावर आल्याने चालकांचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.सुदौवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.