नांदेड मधील घटना दुर्दैवी मात्र याची सखोल चौकशी करून दोषी वर कारवाई करत अश्या घटना होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करा - नरेंद्र पवार
कल्याण :- नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली असून ही घटना दुर्दैवी असून याप्रकरणात सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई सोबत अश्या घटना घडू नये म्हणून नांदेड सहित राज्यातील विविध शहरातील रुग्णालयामधील सुविधेचा ऑडिट करून त्यावर उपाययोजना करा अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे .
ठाणे नंतर नांदेड मध्ये शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना भयानक असून , सरकारी आरोग्य यंत्रणा काय करते यावर प्रश्न चिन्ह भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे . अश्या घटनांवर रसजकरन न करता ठोस उपाययोजना ही गरजेच्या असल्याचे मत नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले .
कल्याण डोंबिवली सहित राज्यातील विविध शहरात असलेल्या पालिका आणि राज्य सरकार च्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात आता ऑडिट करण्याची गरज असून , त्यात त्रुटी काय आहे त्यावर उपाय योजना करा त्या सोबत नांदेड प्रकरणाची चौकशी ही करण्याची मागणी नरेंद्र पवार यांनी केली आहे.