नांदगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
Raju Tapal
September 26, 2022
44
नांदगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न, दुर्गा मंडळांनी शासनाचे नियम पाळून उत्सव साजरा करावा. नांदगाव पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे ( पाटील) यांचे आवाहन
नाशिक जिल्हा मधील नांदगाव तालुक्यातील नांदगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली असून, येणाऱ्या नवरात्रोत्सव दुर्गा मंडळांनी शासनाचे नियम पाळून उत्सव साजरा करावा असे आवाहन दुर्गा मित्र मंडळ, अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार यांच्या शांतता बैठकीत नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे (पाटील) यांनी आवाहन केले
आगामी नवरात्रोत्सव, दसरा या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये शांतता समिती सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांनी नवदुर्गा उत्सव समितीच्या मंडळांना सूचना केल्या. ते म्हणाले की, यापूर्वी परवानगी घेतलेल्या मंडळांना मूर्ती बसवण्यासाठी व मिरवणुकीसाठी परवानगी दिली जाईल. नव्या मंडळ मूर्ती बसविण्यास परळी दिली जाणार नाही. परंतु ऑनलाईन अर्ज केलेल्या मंडळांना परवानगी दिली जाईल. न्यायालयाच्या आदेशा
नुसार डीजे, डॉल्बीला बंदी आहे. त्यामुळे असे वाद्य लावू नये. कायद्याचे उल्लंघन करू नये असे झाल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल होतील. तसेच उत्साह काळात ध्वनी क्षेपकाचा आवाज 55 डेसिबलच्या आत असावा. रात्री दहा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी आहे. धार्मिक सन धार्मिक परंपरेनुसार साजरे करावे. आपल्यापासून चुकीची पद्धत पडता कामा नये. ही काळजी मंडळांनी घ्यावी. कोणतेही धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य वक्तव्य करू नये
नवरात्र उत्सव काळात व विसर्जन मिरवणुकी वेळी वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी वीज कंपनीला मी पत्र देणार आहोत. मिरवणूक मार्गात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका मुख्याधिकाऱ्यांना कळविले असल्याचेही पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांनी बोलताना सांगितले.
तसेच यावेळी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी नवरात्र उत्सव कार्यक्रमात, मिरवणुकीत, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले व उपस्थितांचे आभार मानले. बैठकीच्या वेळी नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील व नांगर शहरातील दुर्गा मंडळाचे पदाधिकारी, महिला, पदाधिकारी पत्रकार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी गोपनीय शाखेचे दत्ता सोनवणे यांनी नियोजन केले.
Share This