नांदगाव येथे पाटील यांचा सत्कार करून वकील दिवस साजरा
येथील स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्वर्गीय सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुउद्देशीय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नांदगाव येथे वकिलांचा शॉल व गुलाब पुष्प देऊन वकील दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वकील कासलीवाल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव कोर्टाचे न्यायाधीश उबाळे, सुशीला पारख
श्यामभाऊ पारख, अनिल करवा
अनिल धामणे, आणि वकील संघाचे अध्यक्ष गजानन सुरोशे आदी उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश उबाळे त्यांच्यासह वकील संघाचे पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी सचिन साळवे, बी आर चौधरी, अमोल आहेर, कासार, दराडे, बोगिर, घुगे, सरोदे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साळवे यांनी केले तर अनिल धामणे यांनी आभार मानले.