नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल - माणगाव तालुक्यातील नांदगाव नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात 52वा स्थान पटकावले
केंद्रीय नगर विकास व गृहनिर्माण
मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण2021 च्या निकालात नांदगाव शहराने भारतातील संपूर्ण पश्चिम क्षेत्रात (577 ) घरामध्ये 52 वा क्रमांक ( स्थान ) मिळवण्यात यश आले नांदगाव शहराला कचरामुक्त मानांकनात एक स्टार मिळाला. नांदगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विजय धांडे यांनी सांगितले की, नांदगावकरांच्या सहकार्याने अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरचे स्थान प्राप्त करू शकले.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने देशभरात स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविली होती. यात जानेवारी ते 31 मार्च 2021 दरम्यान हातामध्ये सर्व शहरांचा समावेश करण्यात आला होता. विविध शहरांचे स्वच्छतेच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. देशातील स्वच्छ सर्वेक्षण2021 साठी 4320 शहरे सहभागी झाले होते. शहरांची निवड करताना स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत सर्वात स्वच्छ शहरासाठी रेटींग स्टार दिले गेले. दिल्लीमध्ये शनिवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानभवनात राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्यातर्फे स्वच्छ शहरासाठी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला.