न-हे येथील नवले पुल परिसरात विचित्र अपघात ;
Raju Tapal
October 22, 2021
31
न-हे येथील नवले पुल परिसरात विचित्र अपघात ; दोन महिलांचा मृत्यू ,चार जण गंभीर जखमी
----------------
न-हे येथील नवले पूल परिसरात आज गुरूवार दि.२१ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या महिलांची तसेच जखमींची नावे समजू शकली नाहीत.
साता-याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका कंटेनरने पिक अप वाहनाला धडक दिली. त्यामुळे पिक अप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन दुचाकींना पिक अपची धडक बसली.कंटेनरने पिक अपला धडक दिल्यानंतर न थांबता पुढील दोन तीन वाहनांना धडक दिली
न-हे गावचे उपसरपंच सागर भूमकर, डॉ. एन बी आहेर व कार्यकर्त्यांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केले. अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली.
नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने तीव्र उतार असल्याने सुसाट जाणा-या वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होत असते.ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होवून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन उपाययोजना करण्याऐवजी बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला.
Share This