• Total Visitor ( 84585 )

नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

Raju Tapal October 08, 2022 35

नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत,
        नाशिकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला भीषण आग लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांसह आयुक्तांशी माझे बोलणे झाले आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचरात काही कमी पडू नयेत अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जखमी असणाऱ्यांचा उपचाराचा खर्च शासन करणार

नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात येतील तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. परंतू आता जे जखमी आहेत, त्यांना उपचार देण्याला आता प्राधण्य द्यावं, अशा सुचना मी दिल्या असल्याचे शिंदे म्हणाले. ही बस मुंबईकडून यवतमाळकडे जात होती. त्यावेळी एक ट्रकला धडकल्यामुळं आग लागल्याची घटना घडली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जकमी असणाऱ्यांपैकी दोन ते तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्वत: महापालिका आयुक्त हजर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जखमींवरचा उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे, तर मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

नेमकी घटना काय?

नाशिकमध्ये खासगी बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे. ही बस यवतमाळकडून मुंबईकडे जात होती. या बसची एका ट्रकला धडक लागल्यामुळं आग लागली. बसने पेट घेतल्यानं त्यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झालाआहे. ही बस स्लीपर कोच होती. दरम्यान या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. 38 जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Share This

titwala-news

Advertisement