MENU
  • Total Visitor ( 136368 )

नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Raju Tapal January 13, 2023 69


नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Share This

titwala-news

Advertisement