कोंढापुरी पाझर तलावातून पाईपाला जोडलेला नेपल फ्लॅन्च चोरीस
शिरूर :- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावातून पाईपाला जोडलेला नेपल फ्लॅन्च चोरीस जाण्याची घटना घडली.
चोरीच्या घटनेबाबत कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी सांगितले,
कोंढापुरी येथील पाझर तलावात महिनाभरापासून पाणी नसल्याने मी माझे काळे पाईप गोळा करून एकत्रित ठेवले होते. पाझर तलावात पाणी आल्याचे आज शुक्रवार दि.२८ मार्च २०२५ रोजी सकाळी समजल्याने सकाळी आठ - साडेवाजता पाझर तलावातील पाणी पाहाण्यासाठी गेलो असता एकत्रित ठेवलेल्या पाईपाची तपासणी करत असताना २ इंची पाईपाला जोडलेला अंदाजे ३०० /- रूपये किंमतीचे नेपल व फ्लॅन्च चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
दि. ३१/०५/२०१९ रोजी ही विद्यूतमोटारीला जोडलेला अंदाजे ५० फूट काळ्या रंगाचा मोविलेक्स कंपनीचा पाईप ही चोरीस गेला होता.
चोरीस गेलेल्या या पाईपाची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.
त्यानंतर दि.१२/०६/२०२३ सायंकाळनंतर ते १३/०६/२०२३ सकाळ दरम्यान चोरीस गेलेल्या लाडा कंपनी साडेसात एच पी विद्यूतपंप चोरीस गेल्या बाबत शिक्रापूर येथील पोलीस स्टेशनमध्ये दि.१३/०६/२०२३ रोजी तक्रार दिलेली आहे.
शिरूर वरून वेळोवेळी आणलेली ७४७०/- रूपये किंमतीची ३० -३०-३० मीटरचे एकूण ९० मीटर तांब्याची केबलही चोरीस गेलेली आहे.
त्यानंतरही अडीच इंची अंदाजे ५० फूट काळ्या रंगाचा पाईपही चोरीस गेलेला आहे.
चोरीच्या या घटनांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी म्हटले आहे, मला व्यक्तिश; त्रास देण्याच्या उद्देशाने माझ्या चोरीच्या घटना वारंवार घडत असून माझी चोरी करण्यासाठी चोरट्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे )