शिरूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शिक्षण संस्थेत डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी सोमवारी दि.९ मे २०२२ ला रोजी साजरी करण्यात आली.
शालेय समिती सदस्य निलेश मोहनलाल खाबिया यांच्या हस्ते डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रा. कृष्णा नामदेव जगदाळे, प्रा. बाळासाहेब नारायण गिरीगोसावी, विठ्ठल ठोकळ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शालेय समिती सदस्य निलेश खाबिया म्हणाले, सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळावा या भावनेने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून ज्ञानगंगा समाजाच्या तळागाळात पोहचविण्याचे कार्य रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी केले.