महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या “जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था” आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे काम करणारी सामाजिक संस्था “न्यू प्रेस्टीज सोशल वेल्फेअर असोसिएशन” यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण तालुक्यातील वासुंद्री येथे ’न्यु प्रेस्टिज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज’ मध्ये दिनांक १९ मे,२०२२ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा शेकडो लोकांनी लाभ घेतला.
शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उपचार करण्यात आले. यामध्ये ब्लड, शुगर, सगळ्या लोकांचे हृदय रोग, ईसीजी तसेच अन्य व्याधीवर तपासणी करण्यात आली. यासाठी “तेरणा हॉस्पिटलॲंड रिसर्च सेंटरच्या” तज्ञ डॉक्टरांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरातून असे निष्पन्न झाले की आलेल्या रुग्णांपैकी १६ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, सदर १६ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्या रुग्णांना हॉस्पिटलला जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स सुद्धा मोफत उपलब्ध करून दिलेली आहे.