वृत्त निवेदिका दिपाली केळकर यांचे हस्य संजवनी विषयावर व्याख्यान संपन्न
गणेश जाधव मदत फाऊंडेशन रामबाग सिंडिकेट कल्याण यांच्या वतीने व माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विणाताई जाधव यांच्या माध्यमातून तसेच विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ,रामबाग जेष्ठ नागरिक संघ,राणी लक्ष्मीबाई जेष्ठ नागरिक संघ,रामबाग ओनर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत व्याख्यान माला कार्यक्रमाचे आयोजन नुतन विद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून व्याख्यान मालेची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विणाताई जाधव यांच्या हस्ते व्याख्याते दिपाली केळकर यांचा सन्मान करण्यात आला. व्याख्यान मालेच्या दुसऱ्या दिवशी
वृत्त निवेदिका दिपाली केळकर यांनी हस्य संजीवनी या विषयावर महिलांशी संवाद साधला मनाची सुंदरता प्रसन्नता, मनाचे आरोग्य, मनाचे रंग,आदि विषयी महिलांशी संवाद साधला, तसेच पु.ल.देशपांडे यांचे काही किस्से सांगितले, वैद्यकीय क्षेत्रातील हि किस्से सांगितले.
यावेळी असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर दिवटे यांनी केले.