• Total Visitor ( 133676 )

न्हावरे ते पुणे स्टेशन पी एम पी बससेवेचे नागरिकांकडून स्वागत

Raju Tapal October 26, 2021 41

न्हावरे ते पुणे स्टेशन पी एम पी बससेवेचे नागरिकांकडून स्वागत

 

न्हावरे ते पुणे स्टेशन पी एम पी एम एल बससेवेचे न्हावरे परिसरातील नागरिकांकडून उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले.

शिरूर तालुक्यातील प्रवासी नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची ठरत असलेली पी एम पी बससेवा यापूर्वी तळेगाव ढमढेरे पर्यंत सुरू होती. त्यानंतर रांजणगाव गणपती, कारेगाव परिसरातील नागरिकांसाठी पी एम पी बससेवा सुरू करण्यात आली.

शिरूर, हवेलीचे आमदार, ऍड. अशोकबापू पवार यांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या न्हावरे ते पुणे स्टेशन बससेवेचा सोमवारी दि.25 ऑक्टोबरला प्रारंभ करण्यात आला. न्हावरे येथील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी या बससेवेसाठी विशेष प्रयत्न केले.

बसचे चालक ,वाहक यांना औक्षण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. 

फुलांनी सजविलेल्या बसचे न्हावरे, उरळगाव, दहिवडी, पारोडी, टाकळीभीमा, ढोरेवस्ती ,तळेगाव ढमढेरे येथील नागरिक, प्रवासी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. 

ही बस तळेगाव ढमढेरे -न्हावरे दरम्यान सर्व बसथांब्यावर थांबणार असून पुणे स्टेशन ते न्हावरे दरम्यान एकूण 22 खेपा केल्या जाणाऱ असल्याचे समजते. 

न्हावरे ते तळेगाव ढमढेरे या रस्त्याची अवस्था  यापूर्वी अतिशय खराब होती. त्यामुळे प्रवाशांनी या रस्त्याने जाणे दुर्लक्षित केले होते. या रस्त्याने अनेकांना प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी साधने उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याचे नुकतेच  पक्के डांबरीकरण करण्यात आल्याने तसेच या रस्त्यावरून नव्यानेच पी एम पी बससेवेचा प्रारंभ झाल्याने प्रवाशांची मोठी  गैरसोय दूर होणार असल्याची प्रतिक्रिया  प्रवासी व नागरिकांनी व्यक्त केली.

Share This

titwala-news

Advertisement